आमच्याविषयी

प्रबोधनकार डॉट कॉम कशासाठी? 

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं साहित्य, विचार आणि कर्तृत्व तरुणांपर्यंत पोचावं, यासाठी प्रबोधनकार् डॉट कॉम या वेबसाईटची रचना करण्यात आली. त्यांची पुस्तकं दीर्घकाळपर्यंत वाचकांसाठी उपलब्ध नव्हती. तसंच त्यांच्याविषयीचं संदर्भ साहित्यही उपलब्ध नव्हतं. ते अभ्यासकांना उपलब्ध व्हावं, हादेखील या मागचा विचार होता. प्रबोधनकारांचे विचार आजच्या काळातही महत्त्वाचे आहेत. त्यांनी केलेलं इतिहासाचं विश्लेषण नव्या काळातही मार्गदर्शक ठरतं. त्यामुळे ते निरंतर आणि चिरंतन शेवटच्या माणसापर्यंत एका क्लिकवर किंवा टॅपवर मिळावेत, अशी इच्छा यामागे आहे. 

लोकार्पण 

१७ सप्टेंबर २०१० या प्रबोधनकार ठाकरे यांच्या १२५ व्या जन्मदिनी प्रबोधनकार डॉट कॉमचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या हस्ते दादर इथे लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला शिवसेना नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, सुभाष देसाई, खासदार राहुल शेवाळे, तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव उपस्थित होत्या. 

या वेबसाईटच्या सोशल मीडिया आणि मोबाईल फ्रेंडली आवृत्तीचं रिलॉन्चिंग २० नोव्हेंबर २०२२ या प्रबोधकारांच्या ४९व्या स्मृतिदिनी होत आहे. यासाठी प्रबोधनकारांचे नातू उद्धव ठाकरे आणि त्यांचे स्नेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होत आहे. दादर येथील शिवाजी मंदिर इथे होणाऱ्या या कार्यक्रमाला शिवसेना नेते सुभाष देसाई आणि संजय राऊत उपस्थित असणार आहेत.

पाठबळ : प्रबोधन प्रकाशन 

वेबसाईटच्या रिलॉन्चिंगसाठी प्रबोधन प्रकाशनने सर्व प्रकारचं पाठबळ दिलं आहे. साप्ताहिक मार्मिक तसंच दैनिक सामना मधून प्रबोधन प्रकाशन शिवसेनेचा विचार महाराष्ट्रभर पोचवतं. याआधी प्रबोधन प्रकाशनने प्रबोधनकारांची अप्रकाशित पुस्तकं प्रकाशित केली आहेत. तसंच प्रबोधनकारांच्या निवडक सुविचारांचा संग्रहही `ठिणग्या` या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केलेला आहे. प्रबोधनकार डॉट कॉम या प्रकल्पासाठी प्रबोधन प्रकाशनचे विश्वस्त सुभाष देसाई यांनी विशेष आस्थेने पाठिंबा दिला. तसंच संचालक विवेक कदम यांनीही महत्त्वाचं सहकार्य केलं. 

प्रबोधनकार डॉट कॉमच्या पहिल्या आवृत्तीची निर्मितीसाठी खासदार राहुल शेवाळे यांनी आर्थिक सहकार्य केलं होतं. 

संकल्पना आणि संपादन : सचिन परब 

प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटची संकल्पना पत्रकार सचिन परब यांची आहे. त्यासाठीचं संशोधन आणि संपादनही त्यांनीच केलंय. पत्रकारितेचा वीस वर्षांहून जास्त अनुभव असलेले सचिन परब यांनी अनेक विविध वर्तमानपत्रं, टीवी चॅनल तसंच वेबसाईटसाठी काम केलंय. त्यांनी प्रबोधन नियतकालिकातल्या प्रबोधनकारांच्या लेखांचे तीन खंड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळासाठी संपादित केले आहेत. 

निर्मिती प्रक्रिया 

प्रबोधनकार डॉट कॉमच्या निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग असलेले मित्र 

कंटेण्ट डेवलपमेंट : अभिजित सोनावणे, सारद मजकूर, पुणे 

पहिल्या आवृत्तीसाठी सिद्धार्थ मोकळे, अमोल मोरे, प्रेरणा तळेकर, श्रीरंग गायकवाड यांनी संपादनात महत्त्वाचं साहाय्य केलं आहे. 

वेबसाईट डिझाइन आणि डेवलपमेंट :  अमित चिविलकर आणि विनायक खोत, आयईज इंडिया आयटी सोल्यूशन्स प्रा. लि. 

पहिल्या आवृत्तीसाठी वेबसाईटच्या तांत्रिक निर्मितीचं काम प्रसाद शिरगावकर यांच्या मराठी वेबसाईट्स डॉट कॉम या कंपनीने केलं होतं. 

पसारा मीडियावर्क्स (ओपीसी) प्रा. लि. 

प्रबोधनकार डॉट कॉम हा प्रकल्प पसारा मीडियावर्क्स (ओपीसी) प्रा. लि. या मुक्ता आणि सचिन परब यांच्या नव्या कंपनीकडून तयार होत आहे. या कंपनीचा हा पहिलाच प्रकल्प असून ती विविध माध्यमांसाठी कंटेण्ट डेवलपमेंट आणि संपादनाच्या कामात सक्रिय असणार आहे